आमचे प्रथम ध्येय शेतमालाला संपूर्ण शेती प्रक्रियेदरम्यान, त्याचबरोबर विक्री बाजारातील शेवटच्या टप्प्यापर्यंत मोठ्या प्रमाणात अॅग्री सोल्यूशन्स देऊन शेतकर्यांचा एकात्मिक विकास करणे हे आहे. शेतकर्याच्या प्रगतीसाठी आम्ही विस्तृत डेटा, तंत्रज्ञान आणि कृषी ज्ञानाचा योग्य समतोल साधत कार्य करतो व मराठवाड्यातील शेतकर्यांना अद्ययावत शेती करण्यास तयार करतो.
अॅग्रोजेनिक्स
शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित
बीज निवडीपासून ते विक्रीपर्यंत, पिकांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात अॅग्रोजेनिक्स सदस्य शेतकर्याबरोबर काम करते जेणेकरून कमी नुकसान आणि अधिक नफा मिळवून शेतकरी यशस्वीपणे आपली शेती करू शकेल.
उत्पन्न फिक्स,
अॅग्रोजेनिक्स !!
कृषिसल्ला
अद्ययावत शेती
एकाच छत्राखाली
अॅग्रोजेनिक्स हे शेतकर्यांसाठी कृषी सल्ला, कृषी निविष्ठांचे एक संपूर्ण पॅकेज आहे, जे शेतकर्यांना त्यांची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करते आणि एकूणच मंडईच्या किंमतीतील अस्थिरतेमुळे होणार्या शेतकर्यांच्या पिळवणुकीला मागे टाकून थेट ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचे उत्पादन पुरवण्यास मदत करते. मराठवाड्यातील शेतकर्यांना सक्षम बनविणे आणि त्यांची योग्यता सिद्ध करण्यात त्यांना मदत करणे हे अॅग्रोजेनिक्सचे उद्दीष्ट आहे.
फायद्याची शेती
लवकरच, मराठवाड्यातील तरुण शेतकर्यांची भरभराट व्हावी व त्यांना शेतीचा आनंद लुटता यावा यासाठी शेतकर्यांना व्यापक व कार्यक्षम पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व्यवस्थापन, मधमाशी पालन आणि रेशीम अळी संगोपन यांसारख्या अधिक सेवा देण्याची आमची योजना आहे, जेणेकरून आजच्या शेतकर्याला शेतीचा अभिमान वाटावा.
अॅग्रोजेनिक्स सेवा
अॅग्रोजेनिक्स शेतकरी उत्पादक कंपनी मराठवाड्यातील शेतकर्यांना समृद्ध शेती करण्यासाठी लागणार्या प्रत्येक बाबीची सेवा पुरवते.
अॅग्रोजेनिक्स शेतकरी उत्पादक कंपनी ही सभासदांना खालील विविध सेवा प्रदान करते आणि खात्री करते की सभासदांना शेती बद्दल सर्व तज्ञ माहिती मिळेल.

कृषी सल्ला

माती चाचणी

पाणी चाचणी

बियाणे

तंत्रज्ञान
यशस्वी वाटचाल

1100
सदस्य शेतकरी

3500
जमीन लागवडीखाली

5
गावे

50
कमी उत्पादन खर्च

अॅग्रोजेनिक्स - एकत्र शेती, सर्वांची प्रगती
अॅग्रोजेनिक्स ही एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी @फार्म या ब्रँड अंतर्गत मार्केटिंग करते.
अॅग्रोजेनिक्स ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी शेतकर्यांची कार्यक्षमता, परिणामकारकता आणि उत्पादकता वाढवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. शेतकर्यांना विश्वसनीय, अस्सल आणि योग्य दरात शेतीला लागणारी प्रत्येक गोष्ट पुरवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि त्यांना अधिकाधिक नफा मिळवून देण्याचे कार्य अॅग्रोजेनिक्स करते.