तरुण शेतकरी, तरुण मराठवाडा

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > तरुण शेतकरी, तरुण मराठवाडा

भारतातील कोरोना व्हायरसच्या वर्चस्वाला आता दीड वर्ष झाले आहे आणि भारताचे भविष्य असणारा तरुण विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन अभ्यास करत आहे. या सगळ्यात कृषी पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना एक खूप चांगली संधी भेटली आहे. ती म्हणजे, शहरात जाऊन, कॉलेज मध्ये शेतीचा फक्त पुस्तकातून अभ्यास करण्याऐवजी, स्वतःच्या शेतात विविध प्रयोग करून शिकण्याची संधी.

याच संधीचा फायदा मराठवाड्याला होताना दिसत आहे, जिथे अनुभवी शेतकरी आजपर्यंत पारंपरिक पीक घेत होते आणि पाण्याच्या कमतरतेला कोसत होते. पण आज आपला तरुण शेतकरी त्याच्या पदवी शिक्षणाचा अभ्यास त्याच्या शेतात आमलात आणतोय आणि त्याचा प्रभाव गेल्या वर्षीच्या मराठवाड्यातल्या शेती उत्पादनामध्ये स्पष्टपणे दिसून येतो आहे.
~ प्रणव रवि नरहिरे

One thought on “तरुण शेतकरी, तरुण मराठवाडा

  1. Ramchandra

    Good startup… with Good concept and ideas..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *