शेतीविकास हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाशी निगडित असतो. फक्त कोरोनाच नाही तर असे विविध प्रकारचे आजार आहेत जे माणसाच्या पूर्ण शरीराला रिक्त करून सोडतात. जगात, स्वतःचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करणे हेच एकमेव पर्याय राहिले आहे. सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. असे म्हटले जाते, की सेंद्रिय अन्नाची मागणी पुढच्या २-३ वर्षात १० पट होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगात आज सगळया लोकांना त्यांच्या कुटुंबाला आजारापासून सुरक्षित ठेवायचे आहे. सगळ्यांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवायची आहे. आणि त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजेच, चांगल्या गुणवत्तेची फळे व भाज्या. शेतकऱ्यांनी सेंद्रिय मागणीसाठी आतापासून तयार व्हायला हवे.
जमिनीचे आरोग्य खराब झाल्यामुळे, मानवाला कॅन्सर सारख्या रोगांचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतीचा खर्च भरमसाठ वाढत असून, शेतकऱ्याला उत्पादन मिळत नाहीये. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी फक्त शेतीच नाही तर पूर्ण सेंद्रिय चक्राचे पालन करू शकतो, म्हणजेच सेंद्रिय खतांचा वापर, मिश्र पिक पद्धती, पिकांची फेरपालट, तण नियंत्रण, वृक्ष लागवड, कंपोस्ट व प्राण्यांचे संगोपन इत्यादि गोष्टी करू शकतो. आदर्श सेंद्रिय शेती पद्धतीचा शेतकऱ्यालाच नाही तर परिसराला व जमिनीला सुद्धा भरपूर फायदा होतो. रासायनिक औषधांचा खर्च, अनावश्यक सिंचन व कीटकनाशकांचा खर्च, सगळेच वाचते आणि सोबतच जमिनीचे आरोग्य उत्तम राहते.
सेंद्रिय शेतीचा फक्त शेतकऱ्याला आणि ग्राहकालाच फायदा नाही तर परिसराला सुद्धा आहे. सेंद्रिय शेतीमुळे, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे सर्व परिसरातील जीवांना ताज्या वातावरणाचा अनुभव होतो. ताज्या वातावरणामुळे सगळ्या माणसांचे आरोग्य निरोगी रहाते. ही संधी फक्त मराठवाड्याच्याच शेतकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांना आहे, आणि ह्या संधीचा मुबलक फायदा त्यांनाच भेटणे शक्य आहे; जे आजपासूनच जमिनीच्या आरोग्याला निरोगी करण्याचा ध्यास घेतील व सेंद्रिय शेतीचा आनंद घेतील. माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा.
~ प्रणव रवि नरहिरे
Leave a Reply