२१ वे शतक सगळ्यात वेगवान विकास घेऊन आले आहे. शतकाच्या सूरवातीतच खूप वेगाने विविध व्यवसायांमध्ये तंत्रज्ञान क्रांती घडली होती. एसटीडी पासून वैयक्तिक टेलिफोन ते डिजिटल टचस्क्रीन फोन पर्यंत, पारंपरिक कॅमेरा पासून डिजिटल कॅमेरा पर्यंत, पेट्रोल वर चालणारी गाडी ते थेट बॅटरी वर चालणारी गाडी पर्यंत, अशी भरपूर तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे. जगातल्या मोठमोठ्या वैज्ञानिकांनी प्रयोग करून हे सिद्ध केलं आहे की शेतीतसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला, तर शेतीचे उत्पादन ५ पटीने वाढू शकते.
भारत हा कृषिप्रधान देश असून, आधुनिक शेतीला पूर्णपणे समर्थन करत नाही. आज बर्याच कंपन्या कृषितंत्रज्ञान सेवा पुरवत आहे आणि बरेच तरुण व प्रगतिशील शेतकरी अधुनिक शेतीकडे वळले आहेत. असेच जर भारतातील सर्व शेतकर्यांनी आधुनिकतेला समर्थन केले तर देशाच्या जीडीपी मध्ये फक्त शेती विभागाचे ५८% पेक्षा जास्त योगदान होऊ शकते. केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या अनुदान, योजना प्रदान करत आहे आणि शेतकऱ्याला सहायता करायला प्रत्येक गोष्टीची चाचणी सतत करत आहे. ह्याचा फायदा भारतभरच्या शेतकर्यांनी घ्यायला हवा, अशी माझी मनापासून इच्छा आहे.
~ प्रणव रवि नरहिरे
Nice work !!
It’s true…. innovation is the future