गटशेती : ही काळाची गरज !

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > AgriEducation > गटशेती : ही काळाची गरज !

कोरोना नंतरच्या काळात आपल्या सगळ्यांची आर्थिक स्थिती ढासाळली आहे व त्यात आपल्या सारख्या शेतकऱ्याची तर अधिकच.
आजच्या काळात तंत्रज्ञान व त्यासोबत तरुण पिढी, शेती करण्याच्या मागावर लागली आहे. पण या सगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी कागदावरच छान दिसतात!! असे का? कारण एकट्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान हाताळणे कठीण जाते, त्याला शेती करण्याची एखादीच आधुनिक पध्दत माहीत असते व तंत्रज्ञान वापरण्यासाठी मोठ्या मोठ्या मशिनरी विकत घेणे परवडत नाही. शेतीचे उत्पन्न पूर्वी पेक्षा दुप्पट करण्यासाठी, पीक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, नवनवीन शेती क्षेत्रातील परीक्षण करण्याठी तो कुठेतरी अपुरा पडत आहे, जमीनीत असो वा कष्टात. राज्यातील शेतकऱ्यांची जमीनधारा कमी असल्याने तो तंत्रज्ञान आमलात आणु शकत नाही व अशी असंख्य कारणे आहेत.

सध्याचा शेतकरी फक्त नावापुरताच बळीराजा आहे. येणाऱ्या काळात जर शतकऱ्याने गट शेतीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गट शेती केल्यास कमी मनुष्यबळात अधिक नफा मिळु शकतो. म्हणून सामुहीक शेतीचा अवलंब करणे, ही काळाची गरज आहे. गट शेती म्हणजे एका भागातील, एका विचारसरणीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील भौगोलिक क्षेत्रात सामुहीक शेती करणे. गट शेतीमुळे उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुखकर करण्यास मदत होणार आहे. गट किंवा सामूहिकरीत्या शेतीमालाचे उत्पादन व विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढणार आहे.

गट शेती सुरू करायला तुम्ही तुमच्या सहकार्‍यांची सोबत घेऊ शकता, पण यात तुम्हाला जास्त नफा भेटणार नाही. तुम्ही एखादी शेतकरी उत्पादक कंपनी (FPO/FPC) स्थापन करून, त्याचे सभासद होऊन, शेती करू शकतात, त्यात तुम्हाला खूप फायदे आहेत. आपलं सरकार सुद्धा अशा कंपन्यांना भरपूर मदत करतं. काही कृषी मालावर काढणीनंतर प्रक्रिया करावी लागते. जसे की हळत, हळदीला मशीनद्वारे ऊकळावी लागते पण ते एका शेतकऱ्याला झेपत नाही. काढणीनंतर प्रक्रिया करून शेतीमालास योग्य भाव मिळणे शक्य होईल. काढलेले पीक सुरक्षित ठेवण्यसाठीची सुविधा एफपीओ ला मिळेल. समूह शेतीमुळे पशुपालन, रेशीम व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रोपवाटिका, आणि मधुमक्खी पालन, इत्यादी जोडधंदे करणे शक्य होऊन, शेतकऱ्यांच्या उत्पादनास चालना मिळेल व खऱ्या अर्थाने शेतकरी बळीराजा होईल.

~ मयुर स्वामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *