तणनाशकांचा अति वापर आणि शेतीची नापिकीकडे वाटचाल…

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > तणनाशकांचा अति वापर आणि शेतीची नापिकीकडे वाटचाल…

शेती आणि शेतकरी या विषयावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच शेती व्यवसाय कशाप्रकारे फायद्याचा व्यवसाय होईल, यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. सध्या शेती ही दोन प्रकारे केली जात आहे. ती म्हणजे जैविक आणि रासायनिक शेती. जैविक शेती म्हणजे नेमकं काय? तर जी शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, ती शेती म्हणचे जैविक शेती. पारंपरिक शेती कशी केली जाते, तर जमिनीला जी अन्नद्रव्ये लागतात ती शेणखताच्या, गांडुळखताच्या मदतीने मिळवणे, तसेच तण व्यवस्थापन करताना कोळपणीच्या, खुरपणीच्या सहाय्याने करणे म्हणजेच तणनाशक न वापरणे. तसेच कीटकनाशक वापरताना पारंपरिक कीटकनाशके वापरणे, याला जैविक शेती म्हणतात. म्हणजे या शेतीतून मिळणारे अन्नधान्य रसायन विरहित मिळणार आहे, त्याने माणसाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि जमीन पण निरोगी राहणार आहे.

याउलट आपली दुसरी पद्धत म्हणजे रासायनिक स्त्रोत वापरून शेती करणे. आता आपण पाहू, रासायनिक शेती म्हणजे काय? व त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो? तर रासायनिक शेती म्हणजे आपण पिकाला लागणारी अन्नद्रव्ये रासायनिक स्वरूपात मिळवणे होय. ते कसे, ते आपण पाहू. आपण पेरणीच्या वेळेस बाजारातून खते विकत आणतो. तसेच त्यासोबतच तन व्यवस्थापनासाठी बाजारातून तणनाशक आणतो. आता बाजारात पेरणीपासून ते काढणीपर्यंत फवारणी करायची तननाशके उपलब्ध आहेत. त्यामुळे खुरपणी, कोळपणीचे कष्ट वाचत आहे. पण हे आपल्याला समजलेले नाही, की या तणनाशकामुळे जमिनिची मोठी हानी होत आहे.

जमिनीत अनेक मित्र जीवणू असतात. ते शेतकऱ्यांचे मित्र असतात. ते जमीन भुसभुशीत करण्याचे, तसेच जमितील अन्नाचे विघटन करण्यास मदत करतात. त्याचा उपयोग पिकांना होत असतो. सर्व जीवाणू मातीतील रासायनिक मिश्रणामुळे मरण पावत आहेत. हे असेच रासायनिक स्त्रोत आपण वापरत राहिलो, तर जमितील हे जिवाणू नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशाने आपल्या जमिनी नापिक होत चालल्या आहेत. त्यामुळेच म्हटलं की तणनाशकांचा अति वापर आपल्या जमिनीला नापिकीकडे घेऊन चालला आहे.

~ रमाकांत शेळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *