बियाणे गावामुळे होणार, शेतकरी स्वावलंबी !

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > बियाणे गावामुळे होणार, शेतकरी स्वावलंबी !

सध्या शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसीत होत आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, नवनवीन संकल्पना वापरल्या जात आहेत. त्या संकल्पनेला सत्यात उतरवण्याचं काम शेतकरी उत्पादन कंपन्या करत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वारं पूर्ण देशभर वाहत आहे. त्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अ‍ॅग्रोजेनिक्स कंपनी प्रयत्न करत आहे.

अ‍ॅग्रोजेनिक्स कंपनीचे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यात मदत करण्याचे उद्धिष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचे उद्धिष्ट आहे. तसाच एक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी येत आहे, तो म्हणजे “बियाणे गाव” करणे. बियाणे गावात शेतकरी फक्त बियाणेच पिकवणार आहेत. तसेच बियाणांवर प्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे त्या गावाची तसेच आजूबाजूच्या बऱ्याच गावांची बियाणांची गरज भागणार आहे. याने शेतकऱ्यांचा बियाणांचा खर्च कमी होणार आहे. एक उदाहरण म्हणून पाहिलं, तर सध्या खरिपाची पेरणी चालू आहे.

मराठवाड्यातील खरिपाचे मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे बीज १२५ रुपये किलो ने शेतकरी विकत घेत आहेत. त्यातही ते सहज उपलब्ध होत नाही. बाजारात तुटवडा झाला की व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतात. आपल्याला “बियाणे गाव” च्या माध्यमातून या खर्चात मोठी बचत होणार आहे. अशाने बियाणांच्या गावामुळे शेतकरी स्वावलंबी होणार आहेत.

~ रमाकांत शेळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *