सध्या मृग नक्षत्र चालू आहे. मृग नक्षत्र म्हणजे पेरणी करण्याचे आवडते नक्षत्र होय. असं म्हटलं जातं की मृग नक्षत्रात पेरणी केल्याने पिक रोगराई मुक्त राहते. मृग नक्षत्र असल्याने आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा जमिनीत ओलावा चांगला राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांची लवकरच पेरणीची लगभग चालू होईल. त्या लगभगित सहसा आपल्या भागात सर्वाधिक पेरा हा सोयाबीन पिकाचा होताना दिसतो. सध्या वातावरणात विविध बदल होताना आपण बघत आहोत. आणि या वातावरण बदलामुळे पिकांना रोग लागण्याची शक्यता जास्त झाली आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्याला काही आधुनिक क्रिया कराव्या लागणार आहेत. ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस आपण जी बियाणे वापरतो ती दोन प्रकारची असतात. ती म्हणजे घरगुती बियाणे आणि दुसरी बाजारातून आणतो ती. त्याला आपण पिशवी (बॅग) म्हणतो. तर बॅग मधली जी बियाने वापरतो त्याला कंपनीने विविध प्रक्रिया करून दिलेले असते त्यामुळे बॅग मधील बियानांची उगवण क्षमता चांगली असते. तसेच त्याच्यावर रोगाचा जास्त प्रभाव पडत नाही. तसेच दुसरी बियाणे म्हणजे आपण ठेवलेली घरगुती बियाणे होय. त्याला आपण कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसते, म्हणून पेरणीच्या वेळेस आपण बीजप्रक्रिया करूनच पेरणी केली पाहिजे. आपल्या मातीत अनेक मातीजन्य रोग असतात. तसेच विविध प्रकारचे किडे असतात. तसेच अनेक शत्रू जिवाणू म्हणजे Bad bacteria असतात त्याला आपण बुरशी पण म्हणतो. मातीतील हे सर्व घटक बिया पेरल्या नंतर बियांची उगवण क्षमता कमी करतात. किंवा उगवलेले कमी क्षमतेचे उगवते. त्यामुळे बिया पेरणी करते वेळी आपण बीजप्रक्रिया केलीच पाहिजे.
बीजप्रक्रियेसाठी काय वापरले पाहिजे ? ते आपण पाहू.
तर बीजप्रकियेसाठी आपण थायरम (३७.५%) आणि कार्बोक्सिन (३७.५ %) हे प्रत्येक किलोला प्रत्येकी ३ ग्रॅम वापरले पाहिजे. तसेच या दोन्हीचे मिश्रन सुद्धा बाजारात उपलब्ध आहे ते २ ग्रॅम वापरले पाहिजे. वर दिलेली रासायनिक क्रिया आहे.
आपण जैविक क्रिया सुद्धा करू शकतो. त्यासाठी आपण ट्रायकोडरमा वापरला पाहिजे. जर
ट्रायकोडर्मा पावडर स्वरूपात असेल तर ५ ग्रॅम/ किलोग्रॅम आणि जर द्रव रुपात असेल तर ६ मिली/किलोग्रॅम वापरावे. यामुळे आपले बियाणे बुरशीमुक्त होऊन त्याची उगवण क्षमता चांगली होणार आहे. एकंदर बीजप्रक्रिया केल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येणार नाही.
~ रमाकांत शेळके
Leave a Reply