महाराष्ट्रात, भारतात आणि पूर्ण जगात, रेशीम कापडाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. रेशीमची मागणी एवढी वाढत चाललीये की भारतात एक दिवशी पुरवठा कमी पडू शकतो.
मराठवाड्याच्या शेतकर्यांना ही एक रेशमी संधी आहे, एक अशी संधी जिथे शेतकरी त्याच्या मातीत पैश्यांचे झाड उगवू शकतो आणि देशभरात आपले नाव गाजवू शकतो.
तुतीच्या लागवडीसाठी, महाराष्ट्राची जमीन व वातावरण हे उत्तम असे म्हटले जाते. तुती लागवड चे एक वैशिष्ठ्य म्हणजे असे की शेतकरी हे पीक दीड ते एक एकरात करूनही भरभराटीचा धंदा करू शकतो. तुती हे एक वार्षिक पीक असून, दर तीन महिन्यात कापणी करावी लागते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्वानुभवणूसार, १३ महिन्यात, ४ वेळा कापणी होते. तुती पीक दर तीन महिन्यात येऊन शेतकऱ्याला श्रीमंत करून जाते.
भारतात, तुती लागवडीसाठी बर्याच योजना आहेत, ज्यातली सर्वात जास्त प्रसिद्ध योजना म्हणजे, मनरेगा योजना. दर वर्षी ५-१० हजार शेतकरी मनरेगा मार्फत तुती लागवडीची नोंद करत आहेत. त्यातले त्यात, जरी ५०% शेतकऱ्यांनी तुती लागवड करायचे म्हटले तरी आज २.५ ते ३ कोटी रोपांची आवश्यकता फक्त महाराष्ट्रात आहे. अणि कोणती ही रोपवाटिका किंवा सरकार सुद्धा एवढी रोपे पुरवून देऊ शकत नाही. तुती ची रोपांना लागवडीसाठी तयार व्हायला साधारण २.५ ते ३ महिने लागतात. म्हणजेच महाराष्ट्रातल्या आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा नवीन संधी म्हणजे तुती ची रोपवाटिका बनवणे, जी खूप महत्त्वाची आणि यशस्वी संधि सिद्ध होईल.
~ प्रणव रवि नरहिरे
Leave a Reply