शेतकरी उत्पादक कंपनी – मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण !

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > शेतकरी उत्पादक कंपनी – मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण !

१ मे, १९६० महाराष्ट्राच्या निर्मितीचा दिवस. हा तोच महाराष्ट्र ज्याला आपण संयुक्त महाराष्ट्र म्हणतो. याच दिवशी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. आपला हा महाराष्ट्र संयुक्त असला तरी या राज्याचे चार प्रमुख भाग पडतात. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि आपला मागास मराठवाडा. आपला मराठवाडा मागास का राहिला ?? मराठवाडा मागास राहिला, कारण आपल्या मराठवाड्यात औदयोगिक वसाहती खूप कमी आहेत; त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त झाले.

तसा मराठवाड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यात इथला पाऊस बेभरवशाचा ! त्यामुळे शेतीउद्योग पण कायम बेभरवशाचा झाला. अशाने व्यसनाचे प्रमाण वाढले. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होऊ लागल्या. याच्या उलट पश्चिम महाराष्ट्राची स्थिती. राजकीय वर्चस्वाचा फायदा घेऊन या भागाने सर्व क्षेत्रात प्रगती केली. आपण आता मुख्य विषयाला येऊ, आपला मुख्य विषय म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी [एफपीसी]. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान.

तसं पाहिलं तर आपल्या राज्यात अनेक एफपीसी कार्यरत आहेत. पण त्या सगळ्या सधन भागातच काम करतात. त्यांनी अजून तरी मराठवाड्यात येण्याची हिम्मत केली नाही. पण आता मराठवाड्यात काम करण्यासाठी, अ‍ॅग्रोजेनिक्स सारख्या एफपीसी सूरु झाल्या आहेत. याचा आपल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी प्रशिक्षित शेतकरी होणार आहे. त्याच्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. तसेच या कंपन्यांचा मुख्य हेतु म्हणजे शेतीचा खर्च कमी करणे, तसेच उत्पादन वाढवणे हा होय. तसेच या कंपन्या शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक उद्योगात मदत करणार आहेत, बरोबरच विविध शासकीय योजना राबविण्यासाठी मदत करणार आहेत. म्हणूनच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यात शेतकरी उत्पादक कंपन्या मोलाची भूमिका बजावणार आहेत.

~ रमाकांत शेळके

One thought on “शेतकरी उत्पादक कंपनी – मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण !

  1. Shital Swami

    ??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *