“सोयाबीन ने ओलांडला 10,000 चा यशस्वी टप्पा”,
ऐकायला ही किती छान वाटतं ना… प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहर्यावर या दहा हजारी टप्यामुळे एक छानशी चमक मात्र नक्कीच आलेली असेल. तो आता सध्याच्या पिकाचे किती रुपये आले असते याचा दिवसातून 2-3 वेळेस विचार नक्कीच करतो. पण हेच भाव पुढे असेच राहतील का ? हा महत्त्वाचा प्रश्न. आता हे भाव असेच चांगले राहतील या आशेवर आहे. पण त्याचवेळेस मागील काही वर्षात सोयाबिनच्या भावामधील चढ-उतार ( शेतकऱ्याकडील माल हा उतरल्या भावानेच घेतला जातो हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही) यामुळे तो थोडा चिंतेतही आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या की, शेतकऱ्याने सोयाबीन विकले ते 4,000-4,500 च्या बाजार भावाने आणि आज काय तर रिकॉर्ड ब्रेक 10,000 रु. बाजारभाव ! मग खरा विचार केला तर हाही प्रश्न पडतो की यामध्ये फायदा नक्की कोणाचा होतोय? शेतकरी आज मात्र फक्त मला आजच्या बाजारभावात किती नुकसान झाले याचाच विचार करतोय, नाही नाही तो विचार करायला हवाच. पण त्याचसोबत आपण आणखी काय-काय करायला हवे ज्याचा भविष्यात फायदा होईल, याचाही विचार करायला हवाच. सध्यातरी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच या भाववाडीचा फायदा होताना दिसत आहे. आत्तापर्यंत सोयाबीनला इतका भाव कधीच मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत सोयाबीनच्या तेलाला तसेच सोयाबीनच्या पेंडीला मागणी वाढलेली आहे. त्यात आवक मोठी नाही त्याचा परिणाम सोयबीनचे भाव वाढतच चालले आहेत. तसेच सोयाबीन चे उत्पन्न तुलनेने कमी झाले आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या दराने सोयाबीन भाववाढीला आधार मिलाला आहे. दक्षिण अमेरिकेतील सोयाबीनचे उत्पादन खूप कमी झाले. तसेच चिनकडून वाढलेली मागणी. अती पावसामुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी झाले, हेही एक प्रमुख कारण आहे. तसेच कोरोना काळात अंडे चिकन खाण्याचे प्रमाण वाढले आहे आणि पोल्ट्री उद्योगामध्ये सोयाबीन हे कोंबड्यांचे प्रमुख खाद्य आहे.
सोयाबीनची भाववाढ कायम राहील का ?
सोयाबीनची अचानकपणे झालेली ही उच्चांक वाढ यामुळे सर्वजण चकीत आहेत. त्यातही शेतकरी जास्त उत्सुक आहे आणि या भाववाढीचा फायदा या वेळी तरी आपल्याला मिळेल. या आशेवर शेतकरी राजा आहे. अती पावसामुळे तसेच कमी मिळणारा बाजारभाव. यामुळे मागील 4-5 वर्षात शेतकऱ्याचे जे नुकसान झालेय ते यावर्षी वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा करताना दिसतोय. तसेच शेतकरी आत्ता सोयाबीन कडे कॅश क्रॉप म्हणून आशेने पाहतोय. पण खरा प्रश्न हाच की ही भाववाढ भविष्यात पण राहील का ? हा प्रश्न शेतकऱ्या समोर आहे. जर यावर्षी ही उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी झाले तर ही भाववाढ कायम राहणार आणि कमी उत्पन्नामुळे मागणी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खासकरून दक्षिण अमेरिकेत याही ही वर्षी उत्पन्न कमी झाले तर ही होणारी भाववाढ भविष्यात अशीच राहील. भाववाढ ही त्या काळातील परिस्थिती नुसार होते, त्यामुळे पुढील काळात ही भाववाढ स्थिर होऊन परिस्थितीनुसार त्यात चढ-उतार पहायला मिळेल. शिवाय हे यावर्षी होणाऱ्या पावसावरतीही अवलंबून आहे. अती पावसामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात तसेच गुणवत्तेत ही घट होते यावर पण भाववाढ अवलंबून आहे. दरवाढीचा फायदा हा शेतकऱ्याला पण होऊ शकतो.
भाववाढीचा फायदा कोणाला?
या झालेल्या दरवाढीचा फायदा हा जास्त करून व्यापाऱ्याला तसेच ज्या मोठ्या शेतकऱ्याकडे सोयाबीन साठवणूक क्षमता आहे, तसेच त्यांनी सोयाबीन वेअर हाउस ला ठेवले अशा खुप कमी, बोटावर मोजणाऱ्या शेतकऱ्याला याचा फायदा झालेला दिसतो. पण सामान्य शेतकऱ्याने हा शेतमाल 4-5 हजार रु. या बाजार भावात विकल्यामुळे त्याला मात्र या दरवाढीचा फायदा झालेला नाही. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, गट शेती, सामूहिक शेती यासारख्या तंत्रयुक्त शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे लागेल. जेणेकरून साधारण शेतकर्याला देखील एफपीओ च्या अंतर्गत वेअर हाउस चा फायदा घेता येईल.
सुरज माने (M.Sc. Organic Chemistry)
क्षेत्र अधिकारी, अॅग्रोजेनिक्स
Leave a Reply