सेंद्रिय शेतीचा उद्देश हा माती, हवा, पशू, पक्षी, मनुष्य व पर्यावरण यांचे आरोग्य वाढविणे हा आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते. सेंद्रिय शेतीतून निघणारे उत्पन्न जरी कमी येत असले तरी ते सकस असते. सेंद्रिय शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकतो. किमान एका देशी गायीचे पालन केल्यास जीवामृत, घनजीवामृत, जैविक खते आदी सहज उपलब्ध होऊ शकते. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवलेल्या अन्नधान्यात जंतुनाशकं अत्यंत कमी प्रमाणात असतात कारण, सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतांना रसायन आणि कृत्रिम खतांचा कमीत कमी वापर केला जातो.
मागील काही वर्षांत रासायनिक कीटकनाशकांच्या अती आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम मानव, मातीचे आयुष्य, प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला मित्रकीटक तसेच परागीभवन करणाऱ्या मधमाशांची संख्यासुद्धा कमी होताना दिसत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याला पर्याय म्हणून सेंद्रिय आणि रासायनिक अवशेषमुक्त शेतीकडे आपल्याला पहावे लागेल.
संपूर्ण जगभरातूनच आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला औषधी वनस्पती, सेंद्रिय दूध आदी खाद्य पदार्थांना मागणी वाढत आहे. कारण रासायनिक खते, कीटकनाशके व अन्य औषधे यांच्या अतिवापराने शेतमाल दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानिकारक ठरतो, हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे. तसेच या रसायनांचा वापर शेतजमीन, पाणी, हवा परिसर यांनाही खराब करतो. प्रदूषणांच्या या दोषांमुळे रसायनाचे उर्वरित अंश नसलेला शेतमाल व दूध वापरावे; असे जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अन्न व कृषी संघटना (FAO) यांनीसुद्धा आवाहन आहे.
१९६० च्या दशकात जी हरित क्रांती झाली, त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात रासायनिक खते तसेच कीडनाशकांचा वापर किती करावा हे ज्ञान मात्र शेतकरी वर्गाला मिळालेले नाही. त्यामुळे यांचा बेसुमार वापर देशात होत असून पाणी, हवा, शेतमाल उत्पादने स्वच्छ राहिली नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे, हाच एक मार्ग आहे.
ते म्हनतात ना, “जान है तो जहान है !!!”
सुरज माने (M. Sc. Organic Chemistry)
It’s true