अॅग्रोजेनिक्स - एकत्र शेती, सर्वांची प्रगती
शेतकरी उत्पादक संस्था
अॅग्रोजेनिक्स ही एक शेतकरी उत्पादक संस्था आहे जी @फार्म या ब्रँड अंतर्गत मार्केटिंग करते.
अॅग्रोजेनिक्स ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी शेतकर्यांची कार्यक्षमता, परिणामकारकता आणि उत्पादकता वाढवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. शेतकर्यांना विश्वसनीय, अस्सल आणि योग्य दरात शेतीला लागणारी प्रत्येक गोष्ट पुरवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि त्यांना अधिकाधिक नफा मिळवून देण्याचे कार्य अॅग्रोजेनिक्स करते.

एकत्र शेती
अॅग्रोजेनिक्स शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे समविचारी आणि समान उद्धिष्ट असणाऱ्या, लहान व मोठ्या, तरुण आणि होतकरू शेतकऱ्यांचा गट आहे. या गटातील शेतकरी ''आत्मनिर्भर भारत" ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन नैर्सगिक, निरोगी आणि उत्तम प्रतीची उत्पादने तयार करून सर्वांच्या प्रगतीसाठी एकत्रित शेती करतात.
सक्षमीकरण
अॅग्रोजेनिक्स हे सदस्य शेतकर्यांना बी पेरणीपासून ते बाजारात माल विक्रीपर्यंत प्रत्येक सूक्ष्म पातळीवर योग्य ती मदत करते. प्रत्येक शेतकर्यास नवनवीन तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, आपल्या शेतीच्या विकासासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. आम्ही, सदस्य शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदान आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यास मदत करतो त्याचबरोबर कमीत कमी खर्चात, संघटित शेती करण्यास प्रोत्साहन देतो.
योग्य मोबदला
अॅग्रोजेनिक्स शेतकरी उत्पादक संस्था @फार्म या ब्रँड अंतर्गत मार्केटिंग करते. @फार्म हे ब्रॅंड मसाले, तेलबिया, धान्य, डाळी त्याचबरोबर काही भारतीय पारंपारिक खाद्य पदार्थांचे रासायनिक अवशेष मुक्त उत्पादन आणि निर्यात करण्यात पारंगत आहे. रासायनिक अवशेष मुक्त उत्पादन (Residue Free) हे जगभरातील लोकांनी निर्णायक पणे स्वीकारले आहे. सदस्य शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळवून देणं, हे अग्रोजेनिक्स चं प्रमुख उद्धिष्ट आहे.

सहकारी कंपन्या




