आम्ही, सदस्य शेतकर्यांना निरंतर पीक सल्ला, हवामान अंदाज, शेती व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, कीटकनाशक व्यवस्थापन प्रशिक्षण आणि बरीच कृषी विषयक सेवा आपल्या मोबाईल अॅप व शेतीशाळे द्वारे पुरवितो. आम्ही, सदस्य शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदान आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यास मदत करतो त्याचबरोबर कमीत कमी खर्चात, संघटित शेती करण्यास प्रोत्साहन देतो.
अॅग्रोजेनिक्स सेवा
अॅग्रोजेनिक्स शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे समविचारी आणि समान उद्धिष्ट असणाऱ्या, लहान व मोठ्या, तरुण आणि होतकरू शेतकऱ्यांचा गट आहे.

कृषी सल्ला
तज्ञांच्या तपशीलवार अभ्यासानुसार सध्याच्या बाजारासंबंधी बाबी, बाजार दर, मंडईचे दर, हंगाम आणि प्रत्येकाच्या जमिनी अनूरूप वैयक्तिकृत सल्ला प्रदान करणे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या माहितीतील विषमता दूर करण्याचे अॅग्रोजेनिक्सचे उद्धिष्ट आहे.


माती चाचणी
अॅग्रोजेनिक्स सदस्य शेतकर्यांना माती परीक्षण करण्यास मदत करते, त्याचबरोबर शेतजमिनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रोत्साहन देते, जेणेकरून ते आपल्या जमिनीला चांगल्या पद्धतीने ओळखतील व चांगले उत्पन्न घेतील, ते देखील कमी खर्चात.


पाणी चाचणी
अॅग्रोजेनिक्स सदस्य शेतकर्यांना पाणी परिक्षणाची सेवा पुरवते, जेणेकरून पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यास आणि पाण्यातील विविध घटकांचे प्रमाण जाणून घेण्यास मदत होते. यामुळे शेतकरी पाण्याचे नियोजन करू शकतो व फक्त आवश्यक त्या घटकांची पूर्तता करणे सोपे होते व उत्पादन खर्च कमी केला जातो.


बियाणे
अॅग्रोजेनिक्स आपल्या शेती दुकानात, बाजारपेठेच्या किंमतीपेक्षा माफक दरात थेट विश्वसनीय उत्पादक आणि पुरवठादाराकडून अस्सल आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देते. अॅग्रोजेनिक्सचे आपल्या सदस्यांच्या मदतीने "बियाणे गाव" तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. जेथे प्रशिक्षित शेतकर्यांचे गट विविध पिकांच्या बियांचे उत्पादन करतील आणि स्वतः बरोबरच आपल्या शेजारच्या गावांची बियानांची गरज अगदी माफक दरात पूर्ण करतील.


तंत्रज्ञान
अॅग्रोजेनिक्स सदस्य शेतकर्यांना मोबाईल अॅप द्वारे ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन पीक सल्ला, हवामान अंदाज, शेती व्यवस्थापन, पाणी आणि कीटकनाशक व्यवस्थापन व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करते. तसेच हे अॅप त्यांच्या पिकानुसार पावलोपावली करावयाच्या कृती बद्दल माहिती देते. अॅग्रोजेनिक्स मोठ्या प्रमाणात कृषी यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करून शेतीची नवनवीन साधने सोयीस्कर वेळी माफक दरात त्यांच्या बांधावर मिळतील याची खात्री देते.
