तंत्रज्ञान

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > तंत्रज्ञान

परिपूर्ण पुरवठा साखळी

स्मार्ट शेती:

शेतकरी अ‍ॅप:

सदस्य शेतकर्‍यांना विविध कृषि निविष्टांची बांधावर उपलब्धता करून देण्यास अ‍ॅग्रोजेनिक्सचे मोबाईल अ‍ॅप मदत करते. या मोबाईल अ‍ॅप द्वारे ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन सल्ला, त्यांचे प्रश्न सोडिण्यासाठी मदत होते तसेच हे अ‍ॅप त्यांच्या पिकानुसार पावलोपावली करायच्या कृती बद्दल वैयक्तिक माहिती देते.

ग्राहक अ‍ॅप:

या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला घरबसल्या उच्च दर्जाचे आणि रासायनिक अवशेषमुक्त भाज्या, फळे, डाळी आणि इतर शेती उत्पादने, तेही योग्य किमतीत ऑर्डर करता येतात.

app1.jpg

प्रिसिजन फार्मिंग:

अचूक शेती (Precision Farming) हवामान स्मार्ट शेतीला सक्षम करते. बदलत्या हवामानामुळे होणार्‍या शेतीतील जोखीमींची देखरेख, त्यांचे शमन आणि त्यांच्यावरील उपाय शोधण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, प्रिसिजन फार्मिंग च्या माध्यमातून मिळते. कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Intelligence) आणि मशीन लर्निंग आधारित प्लॅटफॉर्म, पीक पद्धतींचा शोध लावतात आणि पिकाच्या भविष्याचा अंदाज लावतात, ज्यामुळे पीक विक्रीतील हेजिंग प्रक्रियेचे, कृषी कर्जाचे आणि कृषि विम्यांसारख्या बाबींचे नियोजन करता येते. भौगोलिक माहिती प्रणाली [GIS] तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्‍यांना शेतीची भौगोलिक माहिती, पर्जन्यवृष्टी, तापमान, पीक उत्पादन इ. मधील वर्तमान आणि भविष्यातील चढउतारांचे नकाशे तयार करण्यास आणि प्रोजेक्ट करण्यास सक्षम करते.

precisionFarming.jpg

रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ड्रोन तंत्रज्ञान:

कृषि क्षेत्रातील IoT मध्ये सेन्सर, ड्रोन आणि रोबोट्स आहेत जे इंटरनेटद्वारे कनेक्ट होतात, स्वयंचलीत कार्य करतात आणि डेटा एकत्रित करतात. या डेटाचे विश्लेषण करून कार्यक्षमता वाढते व अचूक अंदाज बांधता येतात. जगभरातील वाढती मागणी आणि कामगारांच्या कमतरतेमुळे कृषी स्वयंचलित यंत्रणा आणि अ‍ॅग्रीबॉट हे शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लावत आहेत. सेन्सर आणि कॅमेर्‍याने सुसज्ज ड्रोनचा उपयोग शेतात इमेजिंग, मॅपिंग आणि सर्वेक्षण करण्यासाठी केला जातो. ते दूरस्थपणे नियंत्रित केले जाऊ शकतात किंवा सेन्सर आणि जीपीएसच्या समन्वयाने फ्लाइट प्लॅन द्वारा स्वयंचलितपणे उड्डाण करु शकतात. ड्रोनच्या आकडेवारीनुसार, पीकांचे आरोग्य, सिंचन, फवारणी, लागवड, माती व शेतात, वनस्पतींची मोजणी व उत्पन्नाचा अंदाज याविषयी अधिक माहिती मिळवता येते.

iot.jpg

पुरवठा साखळीची योग्यता:

शेतकर्‍याला विश्वासनिय कृषि निविष्टांचा पुरवठा होतो.
शेतकरी पिकाची कापणी करतो.
उत्पादनाची सुरक्षित वाहतूक होते.
उत्पादनाचे स्टोरेज, प्राथमिक प्रक्रिया, आणि पॅकेजिंग होते.
उत्पादन वितरण केंद्राकडून किरकोळ स्टोअर मध्ये जाते.
अंतिम उत्पादन ग्राहकापर्यंत पोचते.

supplychain.jpg