आमचे प्रथम ध्येय शेतमालाला संपूर्ण शेती प्रक्रियेदरम्यान, त्याचबरोबर विक्री बाजारातील शेवटच्या टप्प्यापर्यंत मोठ्या प्रमाणात अॅग्री सोल्यूशन्स देऊन शेतकर्यांचा एकात्मिक विकास करणे हे आहे. शेतकर्याच्या प्रगतीसाठी आम्ही विस्तृत डेटा, तंत्रज्ञान आणि कृषी ज्ञानाचा योग्य समतोल साधत कार्य करतो व मराठवाड्यातील शेतकर्यांना अद्ययावत शेती करण्यास तयार करतो.
अद्ययावत शेती
एकाच छत्राखाली
अॅग्रोजेनिक्स हे शेतकर्यांसाठी कृषी सल्ला, कृषी निविष्ठांचे एक संपूर्ण पॅकेज आहे, जे शेतकर्यांना त्यांची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करते आणि एकूणच मंडईच्या किंमतीतील अस्थिरतेमुळे होणार्या शेतकर्यांच्या पिळवणुकीला मागे टाकून थेट ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचे उत्पादन पुरवण्यास मदत करते. मराठवाड्यातील शेतकर्यांना सक्षम बनविणे आणि त्यांची योग्यता सिद्ध करण्यात त्यांना मदत करणे हे अॅग्रोजेनिक्सचे उद्दीष्ट आहे.
फायद्याची शेती
लवकरच, मराठवाड्यातील तरुण शेतकर्यांची भरभराट व्हावी व त्यांना शेतीचा आनंद लुटता यावा यासाठी शेतकर्यांना व्यापक व कार्यक्षम पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व्यवस्थापन, मधमाशी पालन आणि रेशीम अळी संगोपन यांसारख्या अधिक सेवा देण्याची आमची योजना आहे, जेणेकरून आजच्या शेतकर्याला शेतीचा अभिमान वाटावा.


विभागांतर्गत कामांची सुसूत्रता:

फार्म ऑपरेशन: खरेदी व काढणी

वाणिज्य विभाग: उत्पादन किंमत निश्चिती व आर्थिक व्यवहार

उत्पादन विभाग: मागणीनुसार उत्पादनांची ठरलेल्या वेळेत निर्मिती

माहिती तंत्रज्ञान विभाग: ई कॉमर्स यंत्रणा कामकाज नियंत्रण

विक्री विभाग: मागणी नोंदविणे व उत्पादनांचे विपणन

गुणवत्ता हमी विभाग: शेतमालाची गुणवत्ता तपासणी व देखरेख

वाहतूक विभाग: शेतमाल वाहतूक व पुरवठा

जनसंपर्क विभाग: ग्राहक संपर्क व ग्राहक तक्रार निवारण